विराट कोहली फक्त त्याच फॅन्सला भेटतो जे…!!

दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगात आजकाल सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू विराट कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. सलग दोन कसोटी सामन्यात विराटने द्विशतकी खेळी केली आहे तर यावर्षी वनडे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात कोहलीने १ हजार धावा केल्या आहे.

विराटला भेटायला आजकाल सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. विराटचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक फॅन्स आहेत. परंतु विराटला असाच फॅन्सला भेटायला आवडते जे त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही.

काल दिल्ली कसोटीत द्विशतकी खेळी केल्यावर बीसीसीआय टीव्हीसाठी चेतेश्वर पुजाराने विराटची मुलाखत घेतली. त्यात चेतेश्वरने विराटला विचारले की तू एवढा लोकप्रिय आहेस. तुला तुझे खाजगी जीवन जगता येत नाही. त्यामुळे तुला याचा त्रास होतो का?

यावर विराट म्हणतो, ” मी मैदानावर खूप जास्त आनंदी असतो. मला छोट्या मुलांना भेटायला आवडते. कारण ते कोणतेही अपेक्षा ठेवत नाहीत. तसेच क्रिकेटचे तसेच माझे जे खरेखुरे फॅन्स आहेत त्यांना भेटायला आवडत. परंतु सगळ्यांबद्दलच असे असेल असं नाही. जर उद्देश चांगला असेल तर मला त्या प्रत्येकाला भेटायला आवडते. “

सध्या विराट दिल्ली कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करत असून ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या काळात तो सुट्टीवर असणार आहे. कारण तो श्रीलंका संघाविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार नाही.