विराट कोहली त्या कॅप्शनमुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल

भारताचा कर्णधार विराट कोहलीला  चाहत्यांनी नुकत्याच फेसबुकवरील एका पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे ट्रोल केले आहे.

त्याचे झाले असे की भारत आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळला आहे.

या सराव सामन्यात कर्णधार विराट कोहलीने 7 षटके गोलंदाजी करताना आॅस्ट्रेलिया एकादश संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या हॅरि निल्सेनची विकेटही घेतली. निल्सनचा झेल मिड-आॅनला असणाऱ्या उमेश यादवने घेतला.

ही विकेट घेतल्यानंतर विराटला प्रचंड आनंद झाला. त्याने या क्षणाचा पूर्ण आनंद घेताना  जोरदार सेलिब्रेशनही केले होते. त्यामुळे त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

याच व्हिडिओची cricket.com.auने फेसबुकवर टाकलेली पोस्ट विराटने शेअर केली आहे. तसेच या त्याने गमतीने कॅप्शन दिले आहे की ‘असे काय आहे जे कर्णधार करु शकत नाही?’

यावर चाहत्यांनीही मजेशीर कमेंट करत विराटला ट्रोल केले आहे. यात चाहत्यांनी त्याला आयपीएलचे विजतेपद न जिंकता आल्याचीही आठवण करुन दिली आहे.

असे आहेत चाहत्यांच्या कमेंट-

Screengrab: Facebook/virat.kohli
Screengrab: Facebook/virat.kohli

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिकेत आर अश्विन आहे टिम इंडियाचे महत्त्वाचे अस्त्र

भारतीय फलंदाजांसाठी आॅस्ट्रेलियाचा हा गोलंदाज ठरू शकतो मोठा धोका

अॅडलेड कसोटीत टिम इंडियाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आहेत या चार खेळाडूंचे पर्याय

विराटला गोलंदाजी करताना पाहून गोंधळलेल्या यष्टीरक्षक पंतला पडला हा प्रश्न