आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघावर भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. या विजयामुळे कोहली एमएस धोनी सारखा उत्कृष्ठ कर्णधार बनू शकतो असे म्हटले जात आहे.

यातच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी विराट टीका केली आहे. विराट बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक ठेवतो, ज्यामुळे विरोधी संघाला एकेरी धावा काढण्यास सोपे जाते, अशी टिका त्यांनी केली आहे.

विराटवर संघ निवड करताना गोलंदाजावर अधिक भर न दिल्याने आणि त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे विरोधी संघ अधिक एकेरी धावा घेतात अशा टिका होत आल्या आहेत.

“माझ्या मते विराट हा एक उत्तम कर्णधार असून बाकींच्या कर्णधारांप्रमाणे तोही बाऊंड्रीलाईनजवळ क्षेत्ररक्षक अधिक ठेवतो. यामुळे फलंदाजांना एकेरी धावा घेणे सोपे जाते. त्याच एकेरी धावेची मग संघाला मोठी किंमत मोजावी लागते, असे चॅपेल यांनी क्रिकइन्फोला सांगितले.

चॅपेल यांनी 1971-75 दरम्यान 30 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. त्यातील 15 सामन्यात त्यांनी विजय मिळवून दिला. तर पाच सामने अनिर्णीत राहिले.

अॅडलेड कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या तळातील खेळाडूंनी त्रास दिला होता. मात्र या सामन्यात मिळवलेल्या विजयाने भारतीय संघाचा आनंद दुणावला असून विजयी लय कायम ठेवण्याचा त्यांचा विचार आहे.

14 डिसेंबरला दुसरा कसोटी सामना पर्थ येथे होणार असून या मैदानावर जलदगती गोलंदाजाचे वर्चस्व राहिल. यामुळे भारताची येथे कसोटी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण

ज्या विक्रमाला सचिनला २० वर्ष लागले तो विराट ६ वर्षांतच मोडणार

हॅपी बर्थडे युवी… !