किंग कोहलीकडून यंग चाहत्याला क्रिकेट पॅड भेट, पहा व्हीडिओ

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी(30 डिसेंबर) 137 धावांनी विजय मिळवला आहे. हा विजय भारताचा कसोटीतील 150 वा विजय होता.

हा सामना संपल्यानंतर भारतीय संघाने सामना पहायला अलेल्या प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. याच दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या छोट्या चाहत्याला अविस्मरणीय अशी भेट दिली आहे.

विराटने त्याचे स्वाक्षरी केलेले पॅड्स भारतीय संघाच्या छोट्या चाहत्याला भेट दिले आहेत. हा चाहता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना पाहण्यासाठी आला होता.

विराट बऱ्याचदा लहान मुंलाना निराश करत नाही, हे अनेकदा पहायला मिळाले आहे. जिथे शक्य असेल तिथे तो त्याच्या लहान चाहत्यांची भेट घेतो.

मेलबर्न कसोटीनंतर सामना पहायला आलेल्या त्या छोट्या चाहत्याला पॅड भेट दिल्यानंतर विराटवर सोशल मीडीयातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 3 जानेवारी 2019 पासून सुरु होणार आहे. या चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे.

त्यामुळे सिडनीतील कसोटी सामना जर भारताने जिंकला किंवा अनिर्णित राहिला तर भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम

रोहित शर्माच्या जागी या तिघांपैकी एकाला मिळणार संधी

सौरव गांगुलीने अशी हटाई कुणाचीच केली नसेल जशी आज ऑस्ट्रेलियाची केली