किंग कोहलीने गांगुलीच्या या ‘दादा’ विक्रमाला टाकले मागे

पोर्ट ऑफ स्पेन। रविवारी(11 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबर कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या एका विक्रमाला मागे टाकले आहे.

विराटने या सामन्यात 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यामुळे आता विराटचे वनडेत 238 सामन्यात 59.71 च्या सरासरीने 11406 धावा झाल्या आहेत.

यामुळे विराटने वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. विराट आता या यादीत 8 व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीतही विराट गांगुलीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत 311 वनडे सामन्यात 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले दहा फलंदाज-

1)  सचिन तेंडुलकर (भारत) – 18426 धावा (463 सामने)

2)  कुमार संघकारा (श्रीलंका)– 14234 धावा (404 सामने)

3)  रिकी पॉटींग (ऑस्ट्रेलिया)– 13704 धावा (375 सामने)

4)  सनथ जयसुर्या (श्रीलंका)– 13430 धावा (445 सामने)

5)  माहेला जयवर्धने (श्रीलंका)– 12650 धावा (448 सामने)

6)  इंजमाम-उल-हक (पाकिस्तान)– 11739 धावा (378 सामने)

7)  जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 11579 धावा (328 सामने)

8) विराट कोहली (भारत)– 11406 धावा (238 सामने)*

9)  सौरव गांगुली (भारत)–  11363 धावा (311 सामने)

10)  राहुल द्रविड (भारत)–  10889 धावा (344 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

गांगुली-तेंडुलकरनंतर विराट-रोहितची जोडीच ठरली बेस्ट!

विराट कोहलीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

अफगाणिस्तान बोर्डाने मोहम्मद शहजादला सुनावली ही मोठी शिक्षा…