कर्णधार कोहलीने मोडला द वॉल राहुल द्रविडचा हा विक्रम

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करताना माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक विक्रम मागे टाकला आहे.

विराटने आज १०६ चेंडूत ५४ धावा केल्या. भारतीय कर्णधार म्हणून विराटचे हे अंतराष्ट्रीय क्रिकेट मधील ४२ वे अर्धशतक आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने द्रविडच्या ४१ अर्धशतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत कॅप्टनकूल एमएस धोनी अव्वल क्रमांकावर आहे. धोनीची ८२ अर्धशतके आहेत. तर त्याच्या पाठोपाठ ५९ अर्धशतकांसह मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली दुसऱ्या स्थानावर आहे.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतके करणारे खेळाडू:

८२ – एमएस धोनी
५९ – मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली
४२* – विराट कोहली
४१ – राहुल द्रविड