फक्त १ गुण आणि विराट करणार शतकातील सर्वात मोठा पराक्रम…

बुधवारी (22 आॅगस्टला) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना नॉटींगघममधील ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.

या सामन्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी घोषित केली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने वयक्तिक सर्वोत्तम 937 गुण मिळवताना अव्वल स्थानही पटकावले आहे.

त्याने आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत हे प्रथम स्थान मिळवले आहे.

त्याने मिळवलेल्या 937 गुणांमुळे तो आता सार्वकालीन कसोटी क्रमवारीत 11 व्या स्थानी आला आहे. यात त्याने एबी डेविलियर्स, जॅक कॅलिस आणि मॅथ्यू हेडन यांना मागे टाकत हे 11 वे स्थान मिळवले आहे.

परंतु पुढच्या सामन्यात विराटने जर पुन्हा अशीच काहीशी कामगिरी केली तर तो त्याचे गुण वाढणार आहे आणि सार्वकालिन कसोटी क्रमवारीत विराटला याचा मोठा फायदा होणार आहे.

पुढच्या सामन्यानंतर जर विराटचे आयसीसी क्रमारीतील १ किंवा २ गुण वाढले तर तो थेट ७व्या स्थानी झेप घेईल तसेच या यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवेल. या कसोटी मालिकेत अजून दोन सामने बाकी असल्याने विराटला या यादीतील त्याचे स्थान वधारण्याची संधी आहे.

सार्वकालीन कसोटी फलंदाज रेटिंग
९६१ डोनाल्ड ब्रॅडमन
९४५ सर लेओनार्ड हूटटोन
९४५ जॅक हॉब्स
९४२ रिकी पॉन्टिंग
९४१ स्टिव्ह स्मिथ

यापुर्वी कसोटी आणि वनडे अशा दोन्ही क्रमवारीत पहिल्या १०मध्ये स्थान मिळवणारे व्हीव्हीयन रिचर्ड हे जगातील पहिले आणि एकमेव खेळाडू होते. विराट वनडेच्या सार्वकालिन क्रमवारीत १२ जूलै २०१८ला ६व्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्यामुळे विराटकडे असा काहीसा पराक्रम करण्याची मोठी संधी आहे.

कसोटीच्या सार्वकालिन यादीत अव्वल स्थानी सर डॉन ब्रॅडमन असून त्यांनी 1948 साली सर्वाधिक अर्थात 961 गुण कमावले होते.

विराटने एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतरही अव्वल स्थान मिळवले होते. परंतू लॉर्ड्स कसोटीनंतर त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती.

विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश