पाकिस्तानचा हा माजी दिग्गज क्रिकेटपटू झालाय कोहलीचा फॅन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद १६० धावा करत पुन्हा एकदा अनेक विक्रम केले. त्याच्या याच खेळीवर आणि एकंदरीत कारकिर्दीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेट आणि कर्णधार जावेद मियाँदाद भलतेच खुश झाले आहेत.

विराटच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि त्याच्या क्षमतेमुळे जावेद मियाँदाद यांनी विराटला एक बुद्धिमान व जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे.

केपटाऊनमध्ये झालेला वन-डे सामन्यात विराट कोहलीने १५९ चेंडूत नाबाद १६० धावा करून दमदार प्रदर्शन केले होते आणि वन-डे कारकिर्दीमधील ३४वे शतक झळकावले होते.

विराटच्या या शतकामुळे भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकाला १२४ धावांनी विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.

मियाँदाद यांनी एका न्युज वेबसाईटला दिलेलया मुलाखतीत कोहलीचे खूप कौतुक केले. ते म्हणाले कि कोहली हा तांत्रिकदृष्या एक जबरदस्त खेळाडू आहे. तो संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढून विजय मिळवून देतो. त्याची हीच कला त्याला महान फलंदाज ठरवते.

विराटच कौतुक करताना मियाँदाद म्हणाले ,”विराटच्या फलंदाजीच्या शैलीमुळे त्याला धावा बनवण्यासाठी मदत होते. तो एक किंवा दोन वेळा नाही तर जेव्हा जेव्हा फलंदाजी करायला येतो तेव्हा तेव्हा धावा बनवतो. एखाद्या फलंदाजांची जर चांगली कामगिरी होत नसेल तर तो धावा करू शकत नाही पण असा नेहमी होत नाही आणि कोहलीच्या बाबतीत असाच आहे. कोहली हा गोलंदाजांची कमजोरी आणि चांगले गुण जाणून घेऊन त्याच्यानुसार आपल्या खेळात बदल करतो.”