विराट, तू क्रिकेटचा क्रिस्तियानो रोनाल्डो आहेस, मोठ्या खेळाडूची प्रतिक्रिया

मुंबई | विराट कोहली हा क्रिकेटमधिल क्रिस्तियानो रोनाल्डो असल्याचं मत विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने व्यक्त केले आहे. 
“माझी आणि विराटची चांगली मैत्री आहे. माझा छोटा भाऊ डॅरेन त्याच्याबरोबर १९ वर्षाखालील गटात क्रिकेट खेळला आहे. मी कायम माझ्या भावाला विराट सारख क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. मी सध्या इथे आहे म्हणून विराटचं कौतूक करत नाही. ” असे तो विराटबद्दल म्हणाला. 
पुढे विराटची तुलना फूटबाॅलमधील दिग्गज खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डोचा मोहही ड्वेन ब्रावोला झाला.
“मी विराटला माझ्या भावाला क्रिकेटबद्दल मार्गदर्शनही करायची विनंती केली आहे. मी जेव्हा विराटला पहातो तेव्हा मला  क्रिस्तियानो रोनाल्डोची आठवण होते. ” असेही तो पुढे म्हणाला. 
विराट अायपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे तर ब्रावो चेन्नईचा हूकमी खेळाडू आहे.