म्हणून आजचा सामना विराट कोहलीसाठी खास

कोलकाता। आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात ईडन गार्डनवर आयपीएलचा सामना सुरु आहे. हा सामना बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी तसेच कोलकाता संघाचा उपकर्णधार रॉबिन उथप्पा यांच्यासाठी खास आहे.

हे दोघेही आज आयपीएल इतिहासातील १५० वा सामना खेळत आहेत. आजपर्यंत आयपीएलमध्ये १५० सामने खेळण्याचा टप्पा ४ खेळाडूंनीच पार केला आहे. त्यामुळे या यादीत उथप्पा आणि विराट दोघेही विभागून ५ व्या क्रमांकावर आहेत.

याआधी सुरेश रैना, एम एस धोनी, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी आयपीएलमध्ये १५० सामने खेळण्याचा टप्पा पार केला आहे.

त्याचबरोबर विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये ३७.५१च्या सरासरीने ४ शतके आणि ३० अर्धशतकांच्या साहाय्याने ४४२७ धावा केल्या आहेत.

तसेच उथप्पाने आजपर्यंत आयपीएलमध्ये २९.५१ च्या सरासरीने ३७७८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये १५० सामने खेळण्याचा टप्पा पार करणारे खेळाडू:

सुरेश रैना – १६२ सामने
एम एस धोनी – १६० सामने
रोहित शर्मा – १६० सामने
दिनेश कार्तिक – १५३ सामने
विराट कोहली – १५० सामने
रॉबिन उथप्पा- १५० सामने