कोहली आहे जगातील तिसरा महागडा क्रिकेट कर्णधार

सध्या जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची सर्वात जास्त चर्चा होते तो खेळाडू कोण असेल तर पाहिलं नाव येत विराट कोहली. असे जरी असले तरी वार्षिक मानधनात मात्र विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराटचे २०१७ या वर्षाची एकूण कमी ही १ मिलियन डॉलरच्या आसपास असून प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापेक्षा ती ०.१७ मिलियन डॉलरने कमी आहे.

या यादीत सर्वाधिक मानधन मिळवणारा कर्णधार आहे ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ. स्मिथची वार्षिक कमाई आहे १.४६९ मिलियन डॉलर. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा तरुण कर्णधार जो रूट आहे आणि त्याची कमाई आहे १.३८ मिलियन डॉलर.

यातील सर्वात विशेष बाब म्हणजे जगातील सर्वात महागड्या क्रिकेट कर्णधाराचे मानधन हे सर्वात कमी मानधन दिले जाणाऱ्या कर्णधारापेक्षा २० पट जास्त आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये जे मुख्य ९ देश खेळतात त्यातील झिम्बाब्वेच्या ग्रॅमी क्रेमरचे वार्षिक उत्पन्न आहे केवळ 86,000 डॉलर. त्याच्या कमाईच्या तब्बल २० पट उत्पन्न आहे स्टिव्ह स्मिथचे.

क्रिकइन्फो वेबसाईटने यासाठी सर्वे केला असून यात क्रिकेटपटूंचे हे उत्पन्न केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून येणारे आहे. त्यात एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर मिळणार बोनस किंवा मानधन यांचा समावेश नाही. ब्रॅण्ड्स किंवा जाहिराती तसेच वेगवेगळ्या टी२० लीग मधील कमाईचा यात समावेश नाही.

भारतीय खेळाडूंना दरवर्षी बीसीसीआयकडून निव्वळ नफ्यातील २६% वाटा दिला जात असल्याचा उल्लेखही या लेखात आहे. परंतु यातील अर्धे पैसे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तर अर्धी रक्कम देशांर्तगत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना दिली जाते.