विराटने केला भारताकडून टी२० इतिहासातील सर्वात मोठा विक्रम

राजकोट । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात १० धावा करून विराटने मोठा विक्रम केला आहे. विराट ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारात ७००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू तर जगातील केवळ ८वा खेळाडू बनला आहे.

विराटने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारचे क्रिकेट खेळायला २००७ साली सुरुवात केली. आजपर्यंत विराटने २२५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.८७ च्या सरासरीने ७००० धावा केल्या आहेत.

त्यात त्याने ४ शतके आणि ५१ अर्धशतके केली आहेत. त्याने एकूण ६५१ चौकर आणि २१७ षटकार खेचले आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय टी२०सामन्यात विराटला अजूनही शतक करता आले नाही.

विराटचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोच्च स्कोर नाबाद ९० आहे.

ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा विंडीजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेलने ३०९ सामन्यात १०५७१ धावा केल्या आहेत.

भारताकडून ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात सुरेश रैना (६८७२), रोहित शर्मा (६६५०), गौतम गंभीर (६१४५) आणि रॉबिन उथप्पा (५४४७) यांनी विराट खालोखाल धावा केल्या आहेत.

ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१०५७१ ख्रिस गेल
८२५४ ब्रेंडॉन मॅक्क्युलम
७५७८ किरॉन पोलार्ड
७५७२ डेविड वॉर्नर
७३३८ ब्रॅड हॉज
७२७० ड्वेन स्मिथ
७२२६ शोएब मलिक
७०००* विराट कोहली