एका इंस्टाग्राम पोस्टसाठी विराटला मिळतात ३.२ कोटी रुपये !

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातील सर्वात जास्त चर्चा होणार क्रिकेटपटू आहे. विराटचा मोठा चाहता वर्गही आहे. जाहिरात किंवा अन्य मार्गातून पैसे कमावण्यातही विराट बाकी भारतीय खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे.

परंतु फोर्ब्स मॅगझीननुसार विराट जगातील सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. बीसीसीआयच्या कराराशिवाय विराट अनेक ब्रॅण्ड्स आणि इतर गोष्टीतूनही मोठा पैसा कमावतो.

विराटाचे इंस्टाग्रामवर १५ मिलियन, ट्विटरवर २० मिलियन आणि फेसबुकवर ३६ मिलियन फॉलोवर आहेत.

खेळाडू हे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे सोशल मीडियासाठी एजन्सीकडे हे काम सोपवतात. फोर्ब्स मॅगझीनमधील एका रिपोर्टप्रमाणे विराट एका इंस्टाग्राम पोस्टसाठी तब्बल ३.२ कोटी रुपये घेतो.

प्रयोजकांच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी विराट तब्बल ३.२ कोटी रुपये घेत असलयाचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एवढ्या मोठ्या किमतीतून अँपल कंपनीचे तब्बल ३५९ आयफोन एक्स येऊ शकतात.