जगातील कोणत्याही खेळाडूला जे जमले नाही ते विराटने केले!

0 65

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने असा एक विक्रम आपल्या नावावर आज केला ज्यासाठी अनेक क्रिकेटपटू आतुर असतात. भारताच्या या कर्णधाराने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली. त्यात कोहली नाबाद राहिला.

या नाबाद शतकी खेळीबरोबर विराटाची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ही ४९.४१ वरून ५०.०३ वर गेली. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी असणारा जागतिक क्रिकेटमधील विराट हा एकमेव खेळाडू आहे.

विराटने आजपर्यत कसोटी क्रिकेटमध्ये ५८ कसोटीमध्ये ५०.०३ च्या सरासरीने ४६०३ धावा केल्या आहेत. त्याची एकदिवसीय सामन्यात सरासरी आहे ५४.६८ आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५२.९६

Comments
Loading...
%d bloggers like this: