भारतीय कर्णधार विराट कोहली सरेकडून काऊंटी क्रिकेटसाठी करारबद्ध!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंड काऊंटी क्रिकेटमधील सरे संघाने करारबद्ध केले आहे.

कोहली संपुर्ण जून महिना या संघाकडून खेळणार आहे. कसोटी खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये यावर्षी इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणारा तो चौथा खेळाडू ठरणार आहे.

सध्या चेतेश्वर पुजारा याॅर्कशायर, इशांत शर्मा आणि वरुन अॅराॅन हे अनुक्रमे ससेक्स आणि लिस्टेशायर संघासाठी खेळत आहेत.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामने होणार असून ३ जुलै पासून टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

त्यासाठी विराटने जून महिन्यात काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विराटची आत्तापर्यंतची इंग्लंडमधील कामगिरी खास अशी झालेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यात १३.४० च्या सरासरीने १३४ धावाच केल्या आहेत.

त्यामुळे या दौऱ्याच्या आधी सराव म्हणून विराट सरे संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळणार आहे.

विशेष म्हणजे विराट हा सरे संघाकडून काऊंटी खेळणारा सहावा भारतीय खेळाडू ठरणार आहे. यापुर्वी अनिल कुंबळे, झहीर खान, मुरली कार्तिक, हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा हे भारतीय खेळाडू संघाकडून खेळले आहेत. आता यात विराटचाही समावेश होणार आहे.

मात्र काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी विराटला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीला मुकावे लागणार आहे. अफगाणिस्तान जून महिन्यात हा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

तसेच अफगाणिस्तानचे या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे. हा सामना १४ जून ते १६ जून असा होईल. याचवेळी ९ जून ते २८ जून दरम्यान काऊंटी क्रिकेटमध्ये सरे संघाचे ३ सामने होणार आहेत. यात त्यांचा सामना हॅम्पशायर, सॉमरसेट आणि यॉर्कशायर या तीन संघाशी होणार आहे.

सरेकडून खेळताना मला अानंद होत आहे, तसेच काऊंटी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न असल्याचे मत यावेळी विराटने व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही!

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?