धोनी, गांगुलीप्रमाणे किंग कोहलीच्या नावावरही झाला नकोसा विक्रम

पर्थ। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना आजपासून(14 डिसेंबर) सुरु झाला आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही नाणेफेक हरल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोसा असा विक्रम झाला आहे. विराटने या वर्षात कसोटीतील ही 9 वी नाणेफेक हरली आहे. त्यामुळे एका वर्षात कसोटीमध्ये 9 किंवा 9 पेक्षा अधिक नाणेफक हरणारा तो केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.

याआधी एमएस धोनीने 2010 मध्ये 12 नाणेफेक हरल्या होत्या आणि 2002 मध्ये सौरव गांगुलीने 11 नाणेफेक हरल्या होत्या. त्यामुळे या एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाणेेफेक हरण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

तसेच परदेशात कसोटीमध्ये यावर्षातील 8 वी नाणेफेक विराट कोहली पराभूत झाला आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात परदेशात सर्वाधिक नाणेफेक पराभूत होणाच्या सौरव गांगुली आणि क्लाइव्ह लॉइड यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

गांगुलीने 2002 मध्येच परदेशात कसोटीमध्ये 8 नाणेफेक हारल्या होत्या. तर लॉइड यांनी 1980 मध्ये परदेशात 8 नाणेफेक हारल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पर्थ कसोटीला आॅस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

पर्थ कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

आयपीएलमध्ये हे ३ खेळाडू खेळणार किंग्ज ११ पंजाबकडून