विराट कोहली का मारतोय पंच ?

दिल्ली । सध्या भारतीय संघातील खेळाडू २ दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेत असताना कर्णधार विराट कोहली मात्र वेगळ्याच कामात व्यस्त आहे. विराट कोहली प्युमा या जगप्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूटिंग करताना दिसत आहे.
भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका भारताने रविवारी जिंकल्यानंतर केवळ २ दिवसांच्या विश्रांतीनंतर अर्थात उद्या भारत विरुद्ध न्यूजीलँड टी२० मालिकेला सुरुवात होत आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडू विश्रांती घ्यायला प्राधान्य देत आहे. मात्र दिल्लीचाच रहिवाशी असलेला कोहली मात्र एका जाहिरातीसाठी खास शूट करत आहे. यात तो व्यायाम करताना तर काहीवेळा पंच मारताना दिसत आहे.
इंस्टाग्राम स्टोरी या प्रकारात विराटने हे विडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यापूर्वीही सुट्टीच्या काळात विराट वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती शूट करताना दिसला आहे.
[VIDEO]: @imVkohli along with teammates at Nueva Restaurant, Delhi Yesterday! pic.twitter.com/KME83JmunW
— Virat Kohli Fan Club (@TeamVirat) October 31, 2017
आज भारतीय संघातील खेळाडू फिरोजशाह कोटला मैदानावर टी२० सराव करणार आहे. हा सामना दिग्गज वेगवान गोलंदाज नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.