विराट कोहलीने केले २९व्या वर्षी तब्बल १० कसोटी विक्रम

कोलकाता । आज कोलकाता कसोटीत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १८वे शतक झळकावले. याबरोबर विराटने अनेक विक्रम केले. ते असे 

– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा विराट कोहली दुसरा भारतीय क्रिकेटपटू. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतके आहेत. 

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा विराट कोहली जगातील केवळ ८वा खेळाडू 

– भारतीय कसोटी कर्णधार म्हणून विराटच्या नावावर ११ शतके. सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी 

-विराट कोहली ५० शतके ३१८ आंतरराष्ट्रीय सामन्यात केली आहे. त्याने ५० वेगवान शतके करताना हाशिम अमलाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

– एका वर्षात ९ आंतरराष्ट्रीय शतके करणारा विराट केवळ तिसरा कर्णधार. यापूर्वी रिकी पॉन्टिंग (२००५, २००६) आणि ग्रॅमी स्मिथ (२००५) यांनी एका वर्षात ९ आंतरराष्ट्रीय शतके कर्णधार म्हणून केली आहे. 

-विराट कोहलीने पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये ५०ची सरासरी गाठली आहे. त्याची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० पेक्षा जास्त सरासरी आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 

-विराटाचे कर्णधार म्हणून हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २१ वे शतक आहे.

-कसोटी क्रिकेटच्या तिसऱ्या डावात त्याचे हे दुसरे शतक आहे. 

– विराट कोहलीने यावर्षी ९ शतकी खेळी करताना ५ वेळा तो ० धावेवर आहे 

-एकाच कसोटीत शतक आणि ० धावेवर बाद होणारा पहिला भारतीय तर जगातील १८वा खेळाडू बनला आहे.