विराटमय दिवस ! विराटने केले तब्बल २५ विक्रम आपल्या नावावर !

 

दिल्ली । आज भारतीय सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी केली. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा केल्या. आज कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी अनेक कारणांनी आणि विक्रमांनी स्मरणात राहील. 

विराटने आज केलेले विक्रम

१–
विराटने पदार्पण केल्यापासून कोणत्याही खेळाडूने विराटपेक्षा जास्त १५० धावा केल्या नाहीत. विराटने ८वेळा तर मायकेल क्लार्क आणि युनिस खान यांनी ७वेळा ही कामगिरी केली आहे.

२–
गेल्या ९ शतकी खेळीमध्ये विराट जेव्हाही बाद झालाय तेव्हा त्याने कमीतकमी १५० धावा केल्या आहेत. २वेळा राहताना १०३ आणि १०४ धावा केल्या आहेत.

३–
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच दिवशी दोन फलंदाजांनी दीडशतक करण्याची पहिलीच वेळ.

४–
कर्णधार नात्याने विराटने ५० डावात ३००० धावा केल्या आहेत. ह्या चौथ्या क्रमांकाच्या वेगवान ३००० हजार धावा आहेत.

५–
कसोटी कर्णधार म्हणून ३००० हजार धावा करणारा कोहली तिसरा भारतीय खेळाडू. एमएस धोनी (३४५४) आणि सुनील गावसकर (३४४९) यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे.

६–
भारतीय कर्णधाराकडून कसोटीत ५० डावात ३००० हजार धावा हा सर्वात कमी डावाचा विक्रम आता कोहलीच्या नावावर

७–
२०१७मध्ये कोहलीने श्रीलंका संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ६ शतके केली आहेत. एका संघाविरुद्ध एकाच वर्षात ६ शतके करण्याच्या विक्रमाची विराटकडून बरोबरी

८–
विराट कोहलीने या मालिकेत ४३६धावा केल्या आहेत. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधाराने केलेल्या ह्या सर्वोच्च धावा आहेत.

९–
एकही अर्धशतक न करता वर्षभरात कसोटीत विराटची ५ शतके. ब्रॅडमन(१९३१), वोक्स(१९४८), लारा(२००५) यांच्या विक्रमाची बरोबरी

१०–
भारतीय कर्णधाराने होम ग्राउंडवर कसोटीत शतक करण्याची चौथी वेळ. यापूर्वी मॅक पतौडी (दिल्ली, २वेळा), गावसकर (मुंबई, दोन वेळा) आणि सचिन तेंडुलकर(मुंबई. एकदा) अशी कामगिरी केली आहे.

११–
एका वर्षात विराटची ११ आंतरराष्ट्रीय शतके. सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये १२ तर रिकी पॉन्टिंगने २००३मध्ये ११ शतके केली होती.

१२–
कोहलीने गेल्या पाच अर्धशतकांचे शतकांत रूपांतर केले आहे. २३५, २०४, १०३*, १०४*, २१३ आणि १५६* अश्या त्या खेळी आहेत.

१३–
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान ५२ शतके करणारा विराट पहिला खेळाडू. ३५० डावात केली ही कामगिरी

१४–
विराट कोहली हा ३ कसोटी सामन्यांच्या सर्व सामन्यात शतकी खेळी करणारा पहिला कर्णधार बनला आहे.

१५–
विराट कोहलीने दुसऱ्यांदा सलग ३ डावात शतकी खेळी आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला कर्णधार

१६–
कर्णधार म्हणून कोहलीचे हे १३वे कसोटी शतक तर २३वे आंतरराष्ट्रीय शतक होते.

१७–
प्रत्येक ६.७३ धावांनंतर विराट कोहली शतकी खेळी करत आहे. विराट एवढ्याच वयाचा असताना सचिनने ६० शतके केली होती. परंतु सचिनने यासाठी ७.२० डाव घेतले होते.

१८–
विराट कोहलीने १०५ कसोटी डावात २० शतके केली आहेत. कमी डावात वेगवान २० शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५वा.

१९–
विराटने २०१७मध्ये २०व्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

२०–
भारताकडून ५ हजार धावा करणारा केवळ ११ वा खेळाडू

२१–
भारताकडून कमी डावात ५ हजार धावा करणारा चौथा खेळाडू, १०५ डावात केली ही कामगिरी. सुनील गावसकर (९५), वीरेंद्र सेहवाग(९८) आणि सचिन तेंडुलकर (१०३) यांनी कमी डावात ही कामगिरी केली आहे.

२२–
सध्या कसोटी खेळत असलेल्या खेळाडूत कमी डावात ५ हजार धावा करणारा दुसरा खेळाडू. स्टिव्ह स्मिथने ९७ डावात ही कामगिरी केली आहे.

२३–
कसोटी क्रिकेटमध्ये जगात ५ हजार धावा करणारा विराट ९४वा खेळाडू

२४–
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी कमीतकमी २ हजार धावा केल्या आहेत त्यात विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अर्धशतकांपेक्षा जास्त शतके केली आहेत.

२५–
कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय कर्णधाराने (१५६* धावा) केलेल्या सर्वोच्च धावा.