विराटने केले ५ नवे विश्वविक्रम

आज भारतीय कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली. त्याबरोबर त्याने काही विश्वविक्रम केले. ते असे

#१ कसोटी, एकदिवसीय आणि टी२० प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी असणारा जगातील एकमेव खेळाडू

#२ कर्णधार म्हणून १० शतकी खेळी करण्यासाठी विराट कोहलीने फक्त २७ कसोटी सामने खेळले आहेत. पहिल्या २७ कसोटीमध्ये कर्णधार म्हणून गावसकर (९), अझहरुद्दीन (७), सचिन (७) यांनी एवढी शकते केली होती.

#३ कोहलीच्या १७ कसोटी शतकी खेळीमध्ये त्याने पहिल्यांदाच सामन्याच्या तिसऱ्या डावात शतकी खेळी आहे.

#४ कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सुनील गावसकर यांच्या नावावर ११ शतकी खेळी असून कोहलीच्या १० तर मोहम्मद अझहरुद्दीनच्या नावावर ९ खेळी आहेत.

#५ दहा शतकी खेळीसाठी सर्वात कमी डाव खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली ५व्या स्थानावर आहे. डॉन ब्रॅडमन (२६), जयवर्धने (३६), स्टिव्ह स्मिथ (३७) आणि स्टिव्ह वॉ (४३) यांचा नंबर कोहली आधी लागतो.