टॉप ५: आज होऊ शकतात हे ‘विराट’ विक्रम

कोलंबो, श्रीलंका | भारताचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल ५ विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.

-विराटनं जर आज लंकेविरुद्ध शतक ठोकलं तर तो जयसूर्याला (२८ शतक) मागे टाकत वनडेत सर्वाधिक शतक बनवणाऱ्या खेळाडूंच्यायादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. विराटपुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(४९), रिकी पॉन्टिंग(३०) हे खेळाडू आहेत.

-वनडे प्रकारात कोणत्याही देशाविरुद्ध कोहलीने अद्याप २००० धावा केलेल्या नाहीत. लंकेविरुद्ध २००० धावा करण्याची कोहलीला सुवर्णसंधी आहे. त्यासाठी त्याला ५५ धावांची गरज आहे. लंकेविरुद्ध यापूर्वी सचिन(३११३) आणि धोनी(२२६१) या भारतीय खेळाडूंनी २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

– यावर्षी वनडे प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी झेप घेण्यासाठी कोहलीला ३९ धावांची गरज आहे. यावर्षी वनडे प्रकारात फाफ डुप्लेसीसने १६ सामन्यात ८१६, जो रूटने १४ सामन्यात ७८५ तर कोहलीने १६ सामन्यात ७७६ धावा केल्या आहेत.

– वनडे प्रकारात ८०० चौकार पूर्ण करण्यासाठी कोहलीला आणखी २३ चौकारांची गरज आहे. वनडे प्रकारात सर्वाधिक चौकार मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर आहेत. सचिनने ४६३ सामन्यात २०१६ चौकार मारले आहेत.

-वनडे प्रकारात ८ षटकार ठोकल्यास कोहलीचं षटकारांचं शतक पूर्ण होईल. त्याने जर अशी कामगिरी केली तर १०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा केवळ ३२वा खेळाडू बनेल.