कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…

पर्थ। उद्यापासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना पर्थमधील नवीन स्टेडीयमवर होणार आहे.

या स्टेडीयमवरील खेळपट्टी ही जून्या पर्थ स्टेडीयम सारखीच असणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरही गवत असेल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार आहे. पण ते पाहून भारताचा कर्णधार विराट कोहलीला चिंता वाटण्यापेक्षा आनंद झाला आहे.

याबद्दल तो आज( 13 डिसेंबर) म्हणाला आहे की ‘आम्ही अशी खेळपट्टी पाहून नर्वस होण्याऐवजी उत्साहित झालो आहे. कारण आम्हाला माहित आहे की आमच्याकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. ज्याप्रकारे प्रतिस्पर्ध्यांचा त्याच्या आक्रमणावर विश्वास आहे तसाच आमचाही आमच्या गोलंदाजी आक्रमणावर विश्वास आहे.’

‘जेव्हा तूमच्याकडे यशाच्या शिखरावर असणारे वेगवान गोलंदाज असतात तेव्हा तूमच्या संघासाठी ती चांगली गोष्ट असते.’

त्यामुळे फलंदाज म्हणून आम्हाला प्रेरणा मिळते की आम्ही चांगली कामगिरी करु कारण आमचा आमच्या गोलंदाजांच्या फळीवर पूर्ण विश्वास आहे.’

‘आम्हाला माहित आहे जर आम्ही चांगली फलंदाजी केली तर आम्हाला हवा असलेला निकाल मिळेल.’

पुढे कोहली म्हणाला, ‘मालिका जिंकण्यासाठी आम्हाला चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती सतत करावी लागेल.’

भारताने या कसोटीसाठी 13 जणांचा संघ जाहिर केला आहे. या संघात इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.

तसेच आॅस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड हे वेगवान गोलंदाज आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी – मुंबईकर रोहित शर्मा, आर अश्विन पर्थ कसोटीला मुकणार

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?