सोशल मीडियावरील विराटच्या फाॅलोवर्सचा आकडा ऐकून अवाक व्हालं!

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते विराटला सोशल मीडियावरही फॉलो करत असतात. त्यामुळे तो सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार विराटला फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर प्रत्येकी 30 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्याला फेसबूकवर 37 मिलियनपेक्षा अधिक, ट्विटरवर 31 मिलियन आणि इंस्टाग्रामवर 39.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

त्याच्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर असून सचिनला ट्विटरवर 30.1 मिलियन फॉलोवर्स आहेत, तर फेसबूकवर 28 मिलियन आणि इंस्टाग्रामवर 16.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जरी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्यालाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. त्याला ट्विटरवर 7.7 मिलियन, इंस्टाग्रामवर 15.4 मिलियन आणि फेसबूकवर 20.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

तसेच भारताचा सलामीवर फलंदाज रोहित शर्माला देखील फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येकी 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्याला इंस्टाग्रामवर 10.5 मिलियन, ट्विटरवर 14.7 मिलियन आणि फेसबूकवर 11 मिलियन फॉलोवर्स आहेत.

अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असलेल्या सुरेश रैनाचे फेसबूकवर 3.1 मिलियन, ट्विटरवर 16.7 मिलियन आणि इंस्टाग्रामवर 9 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगचे फेसबूकवर 14 मिलियन, ट्विटरवर 4.7 मिलियन आणि इंस्टाग्रामवर 7.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला ट्विटरवर 10.1 मिलियन, इंस्टाग्रमावर 3.6 मिलियन आणि फेसबूकवर 6.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्सलाही करोडो चाहते सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याला इंस्टाग्रामवर 8.5 मिलियन, ट्विटरवर 6.7 मिलियन आणि फेसबूकवर 3.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

त्यानंतर भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन असून त्याला इंस्टाग्रामवर 4.8 मिलियन, ट्विटरवर4.1 मिलियन आणि फेसबूकवर 8.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

तसेच सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या ख्रिस गेलला फेसबूक, इंस्टाग्राम आणि ट्विटर मिळून 15 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

असं काहीतरी करा, सौरव गांगुलीचे जगातील संघांना चॅलेंज

पुढच्या वनडे मालिकेत हा खेळाडू खेळणार चौथ्या क्रमांकावर, शास्त्रींचा मोठा खुलासा

आता विराट कोहलीही मारणार विराट कोहली स्टॅंडमध्ये षटकार