युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

भारतीय संघ सध्या टी२० मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत आहे. या संघात निवड झालेल्या युझवेद्र चहलने भारतीय संघ हा एका परिवारासारखा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

“हा संघ एक परिवार आहे. अनुभवी खेळाडूंनी आम्हाला त्यांच्या नावाच दडपण येणार नाही याची काळजी घेतली आहे. कोणत्याही परिस्थीतीवर बोलण्यासाठी कोणताही मोठा खेळाडू सतत तयार असतो. ” असे चहल या दौऱ्याला रवाना होण्यापुर्वी म्हणाला.

कोहली, धोनी आणि रोहित मोठ्या भावासारखे-

“विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे मोठ्या भावासारखे आहेत. सर्व तरुण खेळाडूंचे ते दादा आहेत. त्यामुळे नविन खेळाडू येतात तेव्हा त्यांना संघ एका परिवारासारखा वाटतो. अगदी शिखर धवनही यात मागे नसतो. यामुळे दडपण येत नाही आणि नविन खेळाडू चांगली कामगिरी करतात. हेच संघाच्या विजयाचे रहस्य आहे. ” असेही तो पुढे म्हणाला.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा