विराट- अनुष्का सचिनच्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम’ चित्रपटाच्या प्रीमियरला

आज पीव्हीआर, अंधेरी मुंबई येथे होत असलेल्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघातील सर्वच क्रिकेटपटू उपस्थित होते. त्याशिवाय बहुतेक क्रिकेटपटूंच्या WAGS ही उपस्थित होत्या.

 

यावेळी विराट कोहली, एमएस धोनी, युवराज सिंग उपस्थित होते, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी हा समारंभ मुंबईमध्ये आयोजित केला होता.
यावेळी क्रिकेटपटुंनी मास्टर ब्लास्टर सचिन बरोबर छायाचित्र काढले.  युवराज सिंगने सर्वात प्रथम सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट केले होते.