क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०१८ वनडे संघाचा विराट कोहली झाला कर्णधार

2018 वर्ष संपुन आता 2019 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षीच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास भेट मिळाली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 2018 या वर्षाचा सर्वोत्तम 11 जणांचा वनडे संघ जाहिर करण्यात आला आहे. या संघात 2018 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तसेच 2018 वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कोहलीला या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. विराटने 2018 या वर्षात 14 वनडे सामन्यात खेळताना 6 शतके आणि 3 अर्धशतकांसह 133.55 सरासरीने 1202 धावा केल्या आहेत.

विराटबरोबरच या संघात रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रुटसह जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर यांनाही संधी देण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 2018 या वर्षातील सर्वोत्तम 11 जणांचा संघ – रोहित शर्मा(भारत), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), जो रुट (इंग्लंड), विराट कोहली(भारत, कर्णधार), शिमरॉन हेटमेयर(विंडिज), जॉस बटलर(इंग्लंड, यष्टीरक्षक), थिसरा परेरा(श्रीलंका), रशीद खान(अफगाणिस्तान), कुलदीप यादव(भारत), मुस्तफिजूर रेहमान(बांगलादेश), जसप्रीत बुमराह(भारत).

महत्त्वाच्या बातम्या:

नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर

२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज

२०१८ मध्ये कसोटी क्रिकेट गाजवणारे ५ गोलंदाज