आज विराट कोहलीला हा मोठा विक्रम करण्याची संधी

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

विराटला आंतराष्ट्रीय टी २० मध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ४४ धावांची आवश्यकता आहे. जर त्याने आज या ४४ धावा केल्या तर तो आंतराष्ट्रीय टी २० मध्ये २००० धावा पूर्ण करणारा तिसराच खेळाडू ठरणार आहे.

याआधी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आणि न्यूझीलंडचाच फलंदाज मार्टिन गप्टिलने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये २००० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीतही गप्टिल अव्वल आहे. तर मॅक्युलम दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मॅक्युलमने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असल्याने विराटला त्याला मागे टाकण्याचीही संधी आहे. त्यासाठी विराटला अजून १८४ धावांची गरज आहे.

सध्या विराटच्या आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ५५ सामन्यात ५२.८६ च्या सरासरीने १९५६ धावा आहेत. यात त्याच्या १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ खेळाडू

मार्टिन गप्टिल* – २२०० धावा
ब्रेंडन मॅक्युलम – २१४० धावा
विराट कोहली* – १९५६ धावा
तिलत्करने दिलशान – १८८९ धावा
शोएब मलिक* – १८२१ धावा