एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम आता कोहलीच्या नावावर

मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडेत कोहलीने नाबाद ८१ धावांची खेळी करताना तब्बल १५ हुन अधिक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे भारतीय कर्णधार म्हणून विराटने यावर्षी केलेल्या धावा. 

विराटने २०१७ या वर्षी कर्णधार म्हणून २४ वनडेत ७९.९३च्या सरासरीने तब्बल १२७९ धावा केल्या आहेत. हा विक्रम करताना त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला आहे. 

१९९८ साली अझरुद्दीनने कर्णधार म्हणून ३७ सामन्यात ४३.७२च्या सरासरीने तब्बल १२६८ धावा केल्या होत्या. कोहलीने हा विक्रम मोडताना अझरुद्दीनपेक्षा १३ सामने कमी खेळले आहेत हे विशेष. 

अन्य एक विक्रमात भारतीय कर्णधार कोहलीने या वर्षी २४ सामन्यात ४ शतके आणि ८ अर्धशतके केली आहेत. एका वर्षात सर्वाधिक ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा भारतीय कर्णधाराचा विक्रम आता कोहलीच्या नावावर झाला आहे.