लाॅर्ड्स कसोटीत बॅट न चाललेल्या कोहलीचा एक खास विक्रम

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.

या कसोटीत सामन्यातील पहिल्या डावात विराटला ५७ चेंडूत २३ धावाच करता आल्या. असे असले तरी त्याने एक खास पराक्रम केला.

यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आला आहे.

त्याने यावर्षी २१ सामन्यात ६६.८५च्या सरासरीने १४०४ धावा केल्या आहेत. त्याने यावर्षी जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या जाॅनी बेअरस्ट्रोला मागे टाकले. त्याने ३० सामन्यात १३८९ धावा केल्या आहेत.

यावर्षी केवळ ८ फलंदाजांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात शिखर धवन हा एकमेव भारतीय आहे. त्याने यावर्षी २४ सामन्यात १०५५ धावा केल्या आहेत.

विराटने १४०४ पैकी ५०९ धावा कसोटीत, १४६ धावा टी२०मध्ये तर ७४९ धावा वनडेत केल्या आहेत. गेल्यावर्षी विराटने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८१८ धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते