विंडीजविरुद्धच्या वन-डे मालिकेत सचिनच्या दोन विक्रमांना विराटकडून हादरे

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या जबदरस्त कामगिरी अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. आगामी विंडिजविरूद्धच्या वन-डे मालिकेत विराटला सचिनचा एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी मिळणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा विंडिजविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज  आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला 187 धावांची गरज आहे.

सचिनने विंडिजविरूद्ध 39 सामन्यांत 52.73 च्या सरासरीने 1573 धावा केल्या आहेत. त्याने विंडिजविरूद्ध 4 शतकं आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत.

कोहलीने 27 सामन्यांत 60.30 च्या सरासरीने 1387 धावा केल्या आहेत. कोहलीनेही 4 शतकं आणि 9 अर्धशतकं केली आहेत. विंडीजविरुद्ध भारताकडून सर्वाधिक अर्धशतकं करण्याची संधीही विराटला आहे.

सचिन आणि कोहली नंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रवि़डने 40 सामन्यांत 42.12 च्या सरासरीने 1248 धावा केल्या आहेत.

चौथ्या स्थानावर असणाऱ्या सौरव गांगुलीने 27 सामन्यात 1142 धावा केल्या आहेत. गांगुलीने  विंडीजविरूद्ध 11 अर्धशतकं ठोकली आहेत.

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या चारच भारतीय खेळाडूंनी विंडिजविरूद्ध 1 हजार पेक्षा जास्त धावा  केल्या आहेत.

भारताकडून विंडिजविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे पहिले चार खेळाडू-

– सचिन तेंडूलकर 1573 धावा

– विराट कोहली 1387 धावा

– राहुल द्रविड 1248 धावा

– सौरव गांगुली 1142 धावा

महत्वाच्या बातम्या-