अल्बम: कोहलीसह बेंगलोरच्या खेळाडूंनी मारला सिराजच्या घरी बिर्याणीवर ताव

हैद्राबाद | काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले-आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जाते.

परंतु यामुळे आयपीएलमधील विराटच्या बेंगलोर संघाचा प्ले आॅफचा मार्ग बंद झाल्यात जमा आहे.

काल जेव्हा हा सामना झाला त्याच्या आदल्या दिवशी राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघातील अनेक खेळाडूंनी मोहम्मद सिराजच्या घरी बिर्याणीचा आनंद घेतला. यात कर्णधार विराट कोहली, युझवेंद्र चहल, पार्थिव पटेल आणि मनदीप सिंग हे खेळाडू होते.

Read- मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान

यावेळी खेळाडूंनी टिव्हीवर आयपीएलचा पंजाब विरुद्ध राजस्थान सामना पहातच बिर्याणीवर ताव मारला. डायटसाठी प्रसिद्ध असलेल्या विराटनेही यावेळी बिर्याणीचा आनंद घेतला.

Read- दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व