भारताला दुसरा झटका, कर्णधार कोहली बाद !

0 53

कोलंबो, श्रीलंका । येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतालचा कर्णधार विराट कोहली शतकी खेळी करून तंबूत परतला आहे. कोहलीने ९६ चेंडूत १३१ धावा केल्या, ज्यात १७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

भारताने नाणेफेक जिंकून मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे नेली.

मलिंगाच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात कोहली मुनावेराला झेल देऊन बाद झाला. मलिंगाची ही एकदिवसीय कारकिर्दीतील ३००वी विकेट होती.

आता खेळपट्टीवर भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा खेळत आहेत. रोहित आपल्या शतकाच्या जवळ आहे. भारत २ बाद २३६ अश्या भक्कम स्तिथीत आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: