१० वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विक्रम करण्याची विराटला संधी

0 217

डर्बन । कर्णधार विराट कोहली आज वनडे कारकिर्दीतील २०३वा सामना खेळत आहे. विराटने आजपर्यंत ५५.७४च्या सरासरीने ९०३० धावा केल्या आहेत.

विराटने वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. असे असले तरीही वनडेत ३२ शतके करणाऱ्या विराटला दक्षिण आफ्रिकेत शतक करता आले नाही.

विराट आजपर्यंत ९ देशांत वनडे सामन्यात खेळला आहे. परंतु दक्षिण आफ्रिका सोडून त्याने प्रत्येक देशात एकतरी शतकी खेळी केली आहे.

आज विराटला अशी कामगिरी करण्याची मोठी संधी आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: