विराट कोहली आज पुणे वनडेत करू शकतो हे ५ विक्रम

पुणे । आज भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसऱ्या वनडेत विराट कोहली अनेक विक्रम करू शकतो. त्यातील ५ असे

-वनडेत विराटला ९००० धावा करण्यासाठी आता केवळ १२२ धावांची गरज आहे. २०० वनडेत विराटने ८८८८ धावा केल्या आहेत.

– विराट कोहली आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गिलख्रिस्टचा १५४६१ धावांचा विक्रम मोडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २९व्या स्थानी जाऊ शकतो. सध्या विराटच्या नावावर १५३९८ धावा आहेत.

-विराट आज पुण्यातील एमसीए गहुंजे मैदानावर ३०० धावांचा टप्पा पार करू शकतो. सध्या त्याच्या नावावर या मैदानावर ४ सामन्यात २१८ धावा आहेत.

-जर विराटने आज शतक केले तर त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील भारतातील २१ वे शतक असेल. याबरोबर तो राहुल द्रविडच्या २१ शतकांची बरोबरी करेल. या यादीत अव्वल स्थानी ४२ शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.

-आज जर भारतीय संघ जिंकला तर कर्णधार म्हणून वनडेत कोहलीचा हा ३२ वा विजय असेल. कोहलीने ४१ वनडेत नेतृत्व करताना ३१ विजय मिळवून दिले आहेत.