३३ भारतीय कसोटी कर्णधारांचा विक्रम विराटने मोडला

कोलकाता । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील १८वे शतक केले. अशी कामगिरी करताना कर्णधार म्हणून त्याचे हे ११वे कसोटी शतक ठरले.

भारतीय कर्णधारांमध्ये कसोटीत सर्वाधिक शतके आता संयुक्तपणे विराट कोहली आणि सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. विराटने ४८ कसोटी डावात कर्णधार म्हणून ११ शतके केली आहेत तर गावसकरांनी ७४ कसोटी डावात ११ शतके केली आहे. विराटने गावसकारांपेक्षा तब्ब्ल २६ डाव कमी खेळला आहे.

विराट कोहलीचे हे ५०वे आंतरराष्ट्रीय शतक आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय कर्णधार
११ विराट कोहली (४८ डाव)
११ सुनील गावसकर (७४ डाव)
९ मोहम्मद अझरुद्दीन(६८ डाव)
७ सचिन तेंडुलकर (४३ डाव)