विराट कोहली, रवी शास्त्रींसाठी ही आहे आनंदाची बातमी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सिडनी क्रिकेट ग्राउंडचे कायम सदस्यत्व मिळाले आहे.

शास्त्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही आनंदाची गोष्ट फोटोसह शेयर केली आहे.

कोहली आणि शास्त्री यांच्या व्यतिरीक्त भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा या दोन आतंरराष्ट्रीय खेळाडूंनाच या मैदानाचे सदस्यत्व मिळाले आहे.

“भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका विजय मिळवला याबद्दल अभिनंदन. पाच दिवस चालणारे कसोटी क्रिकेट आत्ताही खेळताना बघून आनंद होतो. ही गोष्ट कसोटी क्रिकेटसाठी लाभदायक आहे”, असे या मैदानाचे अध्यक्ष टोनी शेफर्ड यांनी अधिकृत वेबसाईटवरून सांगताना कोहली आणि शास्त्री यांचे अभिनंदन केले आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. या मालिकेमधील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झाला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 7 विकेट्स गमावत 622 धावा केल्या होत्या. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने सांगितल्या निवृत्तीनंतरच्या योजना, ही आवडती गोष्ट तर बिलकूल नाही करणार!

केएल राहुल, हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढल्या, मायदेशी परतण्याचे आदेश…

टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ