विराट कोहली करतोय जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरण, पहा व्हिडिओ

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 क्रिकेट विश्वचषकात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे.

त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मंगळवारी(9 जूलै) सुरु झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यातही चांगली कामगिरी केली आहे. पण या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना राखीव दिवशी म्हणजेच आज(10 जूलै) सुरु होणार आहे.

हा सामना मंगळवारी सुरु होण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्याने सामना सुरु होण्याआधी बुमराहच्या गोलंदाजी शैलीचे आणि विकेट घेतल्यानंतर बुमराह करत असलेल्या सेलिब्रेशनचे अनुकरण केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये बुमराह ज्याप्रकारे रनअप घेतो आणि चेंडू टाकतो, याचे अनुकरण विराटने केले आहे. तसेच बुमराह विकेट घेतल्यानंतर दोन्ही हात वर करत सेलिब्रेशन करतो, या सेलिब्रेशनचेही विराटने अनुकरण केले आहे.

बुमराहने या विश्वचषकात आत्तापर्यंत भारताकडून 9 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. तसेच तो या विश्वचषकात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाराही गोलंदाज आहे. त्याने या विश्वचषकात आत्तापर्यंत 9 षटके निर्धाव टाकली आहेत.

मंगळवारी सुरु झालेला न्यूझीलंड विरुद्ध भारत सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे.

या सामन्यातही बुमराहने 8 षटके गोलंदाजी करताना 1 षटक निर्धाव टाकले आहे. तसेच 25 धावा देत मार्टिन गप्टिलची विकेट घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून ट्विटरवरुन होत आहे भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका

भारताविरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबरच कर्णधार विलियम्सनने केली एका विश्वविक्रमाची बरोबरी

११ वर्षांनंतर रविंद्र जडेजाच्या बाबतीत झाला हा खास योगायोग