विराटने सांगितल्या निवृत्तीनंतरच्या योजना, ही आवडती गोष्ट तर बिलकूल नाही करणार!

भारताचा कर्णधार विराट कोहलीने तो जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल त्यानंतर काय त्याच्या योजना असतील हे सांगितले आहे. यामध्ये त्याने सांगितले की तो निवृत्तीनंतर बॅटही उचलणार नाही.

बऱ्याचदा निवृत्ती स्विकारल्यानंतर क्रिकेटपटू विविध लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे विराटही ऑस्ट्रेलियाच्या बीगबॅश लीगमध्ये निवृत्तीनंतर किंवा बीसीसीआयने आयपीएल व्यतरिक्त लीगमध्ये खेळणाची परवानगी दिल्यानंतर खेळणार का असे विचारण्यात आले.

यावर विराटने उत्तर दिले की ‘हे पहा मला माहित नाही की मी जे आत्ता विचार करतो आहे ते भविष्यात बदलूही शकतात. पण माझ्यासाठी जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल त्यानंतर मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही.’

‘मी मागील पाच वर्षे खूप क्रिकेट खेळलो आहे आणि मी आत्ता सांगू शकत नाही की मी निवृत्तीनंतर काय करेल. पण मला वाटत नाही की मी पुन्हा माझी बॅट उचलेल.’

‘मी ज्या दिवशी खेळणे थांबवेल तेव्हा माझी संपूर्ण उर्जा संपली असेल आणि त्यामुळेच मी क्रिकेट खेळणार नाही. म्हणून मी परत येउन क्रिकेट खेळण्याचा विचार करत नाही. मी एकदा निर्णय घेतला की तो अंतिम असेल.’

विराटने शनिवार पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेच्या आधी बोलताना भारतीय फलंदाजीच्या फळीचेही कौतुक केले आहे. तसेच ही फळी भक्कम असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय संघात चांगला समतोल असल्याचेही त्याने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुल, हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढल्या, मायदेशी परतण्याचे आदेश…

टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ

आता विराट कोहलीही हार्दिक पंड्या, केएल राहुलच्या विरोधात…