विजयानंतर संघातील १० खेळाडू होते खूश तर एकटा इशांत होता नाराज

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना जिंकला आहे. यामुळे भारतीय संघ सध्या आनंदी असून संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र नाखूष आहे. त्याच्या या नाराजीचे कारण कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.

या सामन्यात इशांतने 95 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र यावेळी त्याने टाकलेल्या नो-बॉल्सचा त्याला स्वत:चाच राग आला आहे. तरीही त्याच्या या नो-बॉल्सने संघाचे काही नुकसान  झाला नाही.

“आम्ही सगळे जल्लोष करत होतो तेव्हा इशांत शांत असल्याने मी त्याला विचारले असता त्याला त्याने टाकलेल्या नो-बॉल्सचा राग आला असल्याचे त्याने सांगितले”, असे विराट सामन्यानंतर म्हणाला.

पहिल्या डावात एरॉन फिंचला बाद करणाऱ्या इशांतने दुसऱ्या डावातही त्याला बाद केले होते. पण तो चेंडू नो-बॉल ठरल्याने फिंचला जीवनदान मिळाले.

तसेच 51व्या षटकातही त्याने शॉन मार्शला टाकलेल्या चेंडूला पंच कुमार धर्मसेना यांनी नो-बॉल ठरवले. हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा क्षण होता. त्यानंतर त्याने टाकलेल्या पुढच्याच चेंडूलाही नो-बॉलचा देण्यात आले. नॅथन लायनला टाकलेला हा चेंडू त्याच्या पॅडला लागला होता आणि लेग स्टंम्पला गेला होता.

“आमच्या फलंदाजांनीही पहिल्या डावात ज्या चुका केल्या त्या सुधारत दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. इशांतही परत नो-बॉल न टाकण्यासाठी चांगला सराव करेल”, असे विराट म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या:

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय

विराट कोहली आणि अॅडलेड…हे नातं काही खास!