पहा विराट कोहलीचा एका दिवसाचा संपूर्ण व्यायाम

जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू अशी विराट कोहलीची ओळख आहे. प्रतिभा आणि त्याला फिटनेसची जोड विराटने दिली आहे. सुरुवातीची काही वर्ष विराट याबद्दल जास्त गांभीर्याने घेत नव्हता. परंतु गेले काही वर्ष विराटने आपल्या फिटनेसकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष दिले आहे.

विराट आपल्या आहाराबद्दलही विशेष जागरूक असतो. याचमुळे हा क्रिकेटपटू इतर क्रिकेटपटूंपेक्षा खूप गोष्टींनीही वेगळा आहे. भारतातील तरुण क्रिकेटप्रेमींमध्ये विराटच्या फिटनेस आणि क्रिकेटबद्दल जोरदार चर्चा असते.

असा हा विराट दिवसाला कोणता कोणता व्यायाम करतो याचा संपूर्ण विडिओ बीसीसीआयने त्यांचं अधिकृत संकेतस्थळावर शेअर केला आहे.

पहा हा संपूर्ण विडिओ: