रोहितबरोबरील वादाबद्दल कर्णधार कोहलीने केले मोठे भाष्य

भारतीय संघाचा विंडीज दौऱ्यासाठी आज(29 जूलै) रवाना झाला आहे. या दौऱ्याला 3 ऑगस्टपासून टी20 मालिकेने सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला आहे.

या दरम्यान विराटने मागील अनेक दिवसांपासून त्याच्या आणि रोहित शर्मामध्ये असणाऱ्या वादाच्या चर्चेंना पूर्ण विराम देताना असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने या वादाच्या वृत्तांना चक्रावून टाकणारे आणि अनादर करणारे आहे, असे देखील म्हटले आहे.

तो रोहित बरोबरील संबंध चांगले असल्याचे सांगताना म्हणाला, ‘माझ्या मतानुसार, हे सर्व गोंधळून टाकणारे आहे. जे काही बाहेर आले, ते वाचणे अत्यंत हस्यास्पद आहे.’

‘मी अनेक कार्यक्रमांना गेलो तिथे आमचे कौतुक केले गेले आणि इथे आपण खोट्या गोष्टी सांगत आहोत, तथ्यांकडे दुर्लक्ष करीत आहोत, ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याकडे डोळेझाक करुन आपल्या डोक्यात कल्पना आणि परिस्थिती निर्माण करीत आहोत. पण रोहितबरोबर कोणतेही वाद नाहीत हेच सत्य आहे.’

तसेच विराट म्हणाला, ‘वैयक्तिक आयुष्यबद्दलच्या गोष्टी मधे आणणे हे मी खूप दिवसांपासून पाहत आहे. हे अनादरणीय आहे. मी 11 वर्षे क्रिकेट खेळतो आणि रोहित 10 वर्षांपासून(12 वर्षांपासून) आणि लोक बाहेरुन अशा गोष्टी तयार करतात हे पाहणे विचित्र आहे.’

त्याचबरोबर विराटने ड्रेसिंगरुममधील वातावरणही चांगले असल्याचे सांगताना खेळाडूंमध्ये मैत्री आदर, समजूतदारपणा आणि विश्वास असल्याचेही सांगितले आहे. असे नसते तर मागील अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी करणे शक्य झाले नसते.

रोहित बरोबरील वादाच्या अफवांनंतर त्याला भेटणे तूला पेचात टाकणारे आहे का, असे विचारल्यावर विराट म्हणाला, ‘जर मला एखादा व्यक्ती आवडत नसेल किंवा त्याच्याबद्दल असुरक्षितता वाटत असेल, तेव्हा तूम्ही ते सर्व माझ्या चेहऱ्यावर पाहू शकता किंवा त्याव्यक्तीबरोबर माझे वर्तन पाहू शकता, हे इतके सोपे आहे.’

‘मला जेव्हाही संधी मिळाली आहे, तेव्हा मी रोहितचे कौतुक केले आहे. कारण माझा विश्वास आहे तो चांगला आहे. या सर्वगोष्टीतून(वादाच्या अफवांमधून) कोणाला फायदा होतो, मला माहित नाही. पण आम्ही भारतीय क्रिकेटला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी जगत आहोत, श्वास घेत आहोत.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराज खेळत असलेल्या लीगचा सामना बाॅंम्बच्या अफवेने पुढे ढकलला

असे मिळणार कसोटी विश्वचषकात संघांना गुण

असे आहे टीम इंडियाचे कसोटी विश्वचषकाचे वेळापत्रक