या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…

एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात विराट कोहलीलाही चांगली खेळी करण्यात अपयश आले होते.

परंतु दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत एक मोठा विक्रम करण्याची विराटला संधी आहे. विराट सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ३५९ सामन्यात ६३ शतके केली आहेत. 

कुमार संगकाराने ५९४ सामन्यात ६३ शतकं केली आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ ७१ शतकांसह ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटींग आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू:

100 – सचिन तेंडुलकर

71 – रिकी पॉटींग

63* –  विराट कोहली

63 – कुमार संगकारा

62 – जॅक कॅलिस

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…