कर्णधार विराट कोहलीचे दणदणीत अर्धशतक!

कोलकाता l येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य राहणेने नंतर आता कर्णधार विराट कोहलीनेही दणदणीत अर्धशतक लगावले आहे. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ४५वे अर्धशतक आहे.

विराटने १९६ आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात ५५च्या सरासरीने ८६३८ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २९ शतके ही केली आहेत. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या २५ सामन्यात १०५४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५५ ची आहे आणि त्याने ५ शतके आणि ५ अर्धशतके केली आहे.

भारताची आता स्थिती ३ बाद १४१ अशी आहे. भारतचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ७ धावत तंबूत परतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव खेळत आहेत. अर्धशतकानंतर आता कर्णधाराचे लक्ष ३१व्या शतकावर असेल.