अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लडमध्ये जून महिन्यात कौंटी क्रिकेट खेळणार असल्याचे जवळ- जवळ  निश्चित झाले आहे, पण त्याचवेळी जूनमध्ये अफगाणिस्तान विरूध्द एकमेव कसोटी सामना आहे.

त्यामुळे बीसीसीआय आणि विनोद राय यांच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती(सीओए) यांच्यात वाद सुरु आहेत.

नुकताच अफगानिस्तान संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. ते त्यांचा पहिलाच कसोटी सामना भारताविरूध्द खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या मते, कोहलीने हा एकमेव कसोटी सामना खेळावा.

परंतू, आज विनोद राय यांनी म्हटले आहे की अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळायचा की कौंटी क्रिकेट खेळायचे याचा निर्णय स्वत: कोहलीच घेईल.

भारताचा जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा आहे. हा दौरा लक्षात घेऊन विराटने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

याबद्दल सीओएच्या भूमिकेबद्दल एएनआयशी बोलताना विनोद राय म्हाणाले, ” सीओएने खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळावे यासाठी प्रेरणा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केसोटी खेळाडूंसाठी. “

“अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी त्यांना थांबविण्याचा कोणताही प्रश्न नाही. श्रीलंकेमध्ये जो संघ खेळला होता तो अफगाणिस्तान विरुद्ध खेळेल.”

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही. अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूला इंग्लंडमधून परत बोलावल जाणार नाही.  इंग्लंड दौऱ्याला आणि तिथे चांगले खेळण्याला पहिले प्राधान्य असणार आहे. “

सध्या चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा  आणि वरूण अॅरोन हे कौंटी क्रिकेट खेळत आहेत, तर आयपीएलनंतर विराट, आर. अश्विन आणि अक्षर पटेलही कौंटी क्रिकेट खेळणार आहेत.

विनोद राय पुढे म्हणाले, ” दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती टाळायची आहे. बीसीसीआयची कार्यकारी समिती आम्ही आहोत. त्यामुळे ते काय बोलतात किंवा विचार करतात त्याचा काही फरक पडत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या –

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

धोनी, तु माझा देव आहेस!

रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप