प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी विराट कोहलीची खास उपस्थिती

मुंबई। प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमातील मुंबई लेगला आजपासून सुरुवात झाली आहे. या लेगचा पहिला सामना महाराष्ट्र डर्बीम्हणून ओळखल्या जाणाऱ्या यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण संघात पार पडला.

या महाराष्ट्र डर्बीच्या सामन्याबरोबरच आज हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याने या सामन्याच्या आधी मुंबई लेगची सुरुवात करताना राष्ट्रीगीताचेही गायन केले.

त्यानंतर त्याने प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याचा आनंद घेतला. यावेळी सामना पाहताना त्याचे अनेक हावभाव प्रेक्षकांना पहायला मिळाले. त्याने अनेकदा यू मुंबा आणि पुणेरी पलटणच्या खेळींना दाद दिली.

या सामन्यात यू मुंबाने 33-23 फरकाने विजय मिळवला आहे.

मुंबई लेगचे सर्व सामने डोम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (Dome, NSCI)एसव्हीपी स्टेडीयमवर होणार आहेत. हा मुंबई लेग 27 जूलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ; या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी

गौतम गंभीरने केले एमएस धोनीचे कौतुक, जाणून घ्या कारण

ठरंल! हे तीन दिग्गज करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड