अखेर किंग कोहलीच आला पाकिस्तानच्या कर्णधाराच्या मदतीला

मँचेस्टर। आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तान संघाला मात्र या पराभवामुळे चाहत्यांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.

तसेच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवरही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने टीका होत आहे. परंतू भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्फराजच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

सर्फराजच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाबद्दल सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘आम्हाला पण प्रथम गोलंदाजी करायची होती. कारण ढगाळ वातावरणात खेळपट्टीमध्ये गोलंदासाठी मदत होते. जर योग्य जागेवर गोलंदाजी कली तर गोलंदाजांसाठी नक्कीच चांगली मदत होती.’

‘प्रामाणिकपणे सांगायचे तर खेळपट्टीमध्ये जास्तकाही बदल झाला नाही. फक्त एक फरक होता की आम्ही फलंदाजी करत असताना आमच्या दुसऱ्या सत्रात चेंडू वळायला लागला होता.’

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. तर केएल राहुलने 57 आणि कोहलीने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहितने केलेल्या शतकी खेळीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे.

रोहितच्या फलंदाजीचे कौतुक करताना विराट म्हणाला, ‘रोहितने आम्हाला आमचा पहिला सामना एकहाती जिंकून दिला होता. दुसऱ्या सामन्यात सांघिक कामगिरी झाली आणि आज पून्हा रोहितचा दिवस होता.’

‘330 धावा धावफलकावर लावण्यासाठी तूम्हाला सांघिक कामगिरीची आवश्यकता असते. राहुलने रोहितबरोबर चांगली भागीदारी रचली आणि रोहित जेव्हा 70-75 धावा करतो तेव्हा त्याला थांबवणे कठिण असते. त्याने आज पून्हा दाखवून दिले की तो वनडेतील उत्कृष्ट खेळाडू आहे.’

‘त्यांनी मला एक निश्चित प्रकारची भूमिका निभावण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे हार्दिकला शेवटी येऊन आक्रमक खेळता आले. आत्तापर्यंत तरी आमच्यासाठी हे मदशीर ठरले आहे. त्यामुळे मधल्याफळीला भक्कमपणा मिळतो. आत्तापर्यंत तरी सर्वकाही सुरळीत सुरु आहे.’

याबरोबरच विराटने भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचेही कौतुक केले आहे. तसेच 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्धचा पराभवाचा अपवाद वगळता भारताने पाकिस्तानविरुद्ध चांगले क्रिकेट खेळले असल्याचेही विराटने म्हटले आहे.

त्याचबरोबर विराट म्हणाला, ‘जर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भावनिक विचार केला, काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात. त्यामुळे आम्ही चाहत्यांच्या दृष्टीकोनाने हा सामना खेळत नाही. एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला सामन्यात काय करणे गरजेचे आहे हे समजून घ्यायचे असते.’

या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान समोर डकवर्थ लुईस नुसार 40 षटकात 302 धावा असे आव्हान ठेवण्यात आले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 40 षटकात  6 बाद 212 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 89 धावांनी पराभव स्विकाराला लागला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात द्विशतकाबद्दल रोहितच्या मनात सुरु होता हा विचार

मॅचच्या आधी ७ तास पाकिस्तानचे खेळाडू करत होते पार्टी, व्हिडिओ झाला व्हायरल

टॉप १०: पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबच किंग कोहलीने केले हे १० खास पराक्रम