Video: भारत-आॅस्ट्रेलियाच्या कर्णधारांमध्येच झाली शाब्दिक चकमक, लायनने घेतले सावरुन

पर्थ। भारत  आॅस्ट्रेलिया संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर(16 डिसेंबर)दोन्ही संघांचे कर्णधार विराट कोहली आणि टीम पेनमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा आॅस्ट्रेलिया संघाने 4 बाद 132 धावा करत 175 धावांची आघाडी घेतली होती. तसेच या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 123 धावांची शतकी खेळी केली आहे. पण तो विवादात्मक झेलमुळे बाद झाला.

त्यामुळे नाराज झालेला विराट आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सतत काहीतरी बोलत होता. या दिवशी शेवटच्या षटकात भारतीय संघाने जेव्हा पेनचा मागे झेल गेल्याचे अपील केले तेव्हा विराट म्हणाला ‘जर त्याने गोंधळ घातला तर मालिका 2-0 अशी होईल.’ विराटचे हे वाक्य स्टंप माइकमधून सर्वांना ऐकू आले.

त्याच्या या वाक्यावर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार पेननेही माघार न घेता विराटला प्रतिउत्तर दिले, ‘त्यासाठी तूम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायला पाहिजे.’

पण तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने हे प्रकरण सावरले. तो म्हणाला, मला वाटते की पेन फक्त विराटला विचारत होता की तो जेवायला कोठे जाणार आहे. मी विराटच्या विरुद्ध बरेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे तो कसा आहे हे मला माहित आहे आणि मला तो किंवा भारतीय संघ काय करत आहे त्याची काळजी नाही.’

‘विराट दिग्गज क्रिकेटपटू आहे. तो त्याच्या भावनांसह खेळतो. आम्हाला ते माहित आहे आणि खरे सांगायचे तर मला विराट कशी प्रतिक्रिया देईल त्याचा फरक पडत नाही. मला आॅस्ट्रेलियाची  ड्रेसिंग रुम कशी आनंदी राहील याची काळजी आहे आणि गोलंदाज म्हणून मला चांगली कामगिरी करायची आहे.’

महत्त्वाच्या बातम्या:

कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी