ख्रिस गेल-विराट कोहलीमधील ही शर्यत जिंकणार कोण?

गयाना। आजपासून(8 ऑगस्ट) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज(8 ऑगस्ट) प्रोविडन्स स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

या वनडे मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आणि वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलला रामनरेश सारवनचा खास विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. सारवन हा वेस्ट इंडीज विरुद्ध भारत यांच्यात वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या आत्तापर्यंतच्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

त्याने भारताविरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये खेळताना 17 वनडे सामन्यात 700 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी गेलला 189 धावांची तर विराटला 145 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता हा विक्रम सर्वात आधी कोण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सध्या गेलने भारताविरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये खेळताना 14 वनडे सामन्यात 512 धावा केल्या आहेत. तसेच विराटने वेस्ट इंडीज विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये 12 वनडे सामन्यात 556 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत यांच्यात वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

700 धावा – रामनरेश सारवन

556 धावा – विराट कोहली

512 धावा – ख्रिस गेल

458 धावा – एमएस धोनी

455 धावा – डेसमन्ड हाईन्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

आज विंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

वाढदिवस विशेष: का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?