प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी उपस्थित राहणार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला शनिवार(20 जूलै) पासून सुरुवात झाली आहे. या मोसमात पहिला होम लेग तेलुगु टायटन्सचा सुरु हैद्राबाद येथे सुरु आहे. हैद्राबाद लेगनंतर 27 जूलै ते 2 ऑगस्ट दरम्यान यू मुम्बाचा होम लेग मुंबईत होणार आहे.

या मुंबई लेगच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली उपस्थित राहणार आहे. या दिवशीचा खेळ सुरु होण्याआधी तो राष्ट्रगीतासाठीही तो उपस्थित असणार आहे.

या लेगमधील पहिलाच सामना महाराष्ट्र डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यू मुम्बा आणि पुणेरी पलटन संघात होणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टलाच दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स संघात होणार आहे.

मुंबई लेगचे सर्व सामने डोम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (Dome, NSCI)एसव्हीपी स्टेडीयमवर होणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो ऐवजी आता दिसणार हे नाव

प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ

प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!