आता विराट कोहलीही मारणार विराट कोहली स्टॅंडमध्ये षटकार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीvs आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्याने अनेक विक्रमही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवले आहे. त्याचे याच यशाचा सन्मान म्हणून दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने(डीडीसीए) दिल्लीतील फिरजशहा कोटला स्टेडीयमच्या एका स्टँडला कोहलीचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्टेडीयममध्ये दिल्लीचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या नावाचेही स्टँड आहेत. पण हे दोन्ही क्रिकेटपटू निवृत्त झाल्यानंतर त्यांची नावे स्टँडला देण्यात आली होती.

मात्र कोहली हा सर्वात युवा सक्रिय क्रिकेटपटू आहे, ज्याचे नाव स्टेडीयममधील स्टँडला देण्यात आले आहे.

याबद्दल डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्माने म्हटले आहे की ‘क्रिकेट जगतात विराट कोहलीच्या शानदार योगदानाने डीडीसीएला सन्मानित केले आहे. त्याने गाठलेली यशाची शिखरे आणि कर्णधार म्हणून केलेल्या विक्रमांबद्दल त्याचा सन्मान करण्यास आम्हाला आनंद होत आहे.’

तसेच पुढे रजत शर्मा म्हणाले, ‘विराट येथे किशोरवयीन वयापासून खेळत आहे. त्याच्या आठवनींना जतन करण्यासाठी डीडीसीए एका स्टँडला त्याच नाव देऊ इच्छित आहे. मला खात्री आहे दिल्लीतील युवा क्रिकेटपटूंना ‘विराट कोहली स्टँड’ हे प्ररणेचे स्त्रोत असेल.’

डीडीसीए भारतीय संघाच्या सदस्यांनाही 12 सप्टेंबरला जवाहरलाल नेहरु स्टेडीयममध्ये सन्मानित करणार आहे.

याबद्दल रजत शर्मा म्हणाले, ‘आम्हाला आनंद आहे की भारतीय संघाचा कर्णधारच नाही तर सलामीवीर फलंदाज शिखर धवन, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे देखील दिल्लीचे आहेत. तसेच संपूर्ण भारतीय संघाचा आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींचा सन्मान करणे ही डीडीसीएसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

तसेच यापूर्वीच फिरोजशहा स्टेडीयमच्या गेटला भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि भारताची माजी महिला क्रिकेटपटू अंजूम चोप्रा यांचे नाव देण्यात आली आहेत. तसेच हॉल ऑफ फेमला माजी भारतीय कर्णधार मन्सुरअली पतौडी यांचे नाव देण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाला विंडीजमध्ये धोका, हल्ल्याच्या मेलमुळे टेन्शन वाढले

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी ही ७ नावे झाली शॉर्टलिस्ट

व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतक करणारा स्मिथ आर्चरचा चेंडू लागल्याने मैदानाबाहेर